Good News : जळगावच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला आता कवयित्री बहिणाबाई चौधरींचे नाव…!

Good News : राज्यातील १४ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच ‘आयटीआय’ना समाजसुधारक आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची नावे देण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार जळगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नाव आता ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’, असे असणार आहे.

Good News : Jalgaon’s Industrial Training Institute has been renamed as ‘Poetess Bahinabai Chaudhary’…!

जळगाव जिल्ह्यातील शामाप्रसाद मुखर्जी सहकारी सूतगिरणी मर्यादित शेंदुर्णी या सूतगिरणीला अर्थसहाय्याच्या गुणोत्तरानुसार निवड करण्यात आली आहे. दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी लिटरमागे सात रुपयांचे अनुदान देण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत ग्रामसेवक तसेच ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून यापुढे त्यांचा उल्लेख ग्रामपंचायत अधिकारी करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. लोहगाव विमानतळाचे नाव बदलून जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानुसार नामकरणाची शिफारस केंद्र शासनास पाठवण्यात येणार आहे.

एसटी महामंडळाच्या ३९ जागा बीओटी तत्वावर विकसित करणार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ३९ भूखंडांचा विकास बीओटी तत्वावर करण्यात येणार असून, या भूखंडांच्या भाडेपट्टा कराराचा कालावधी ३० वर्षांऐवजी आता ६० वर्षे करण्यात आला आहे. या निर्णयामुळे महामंडळाला अतिरिक्त आर्थिक साधनांचा लाभ होईल तसेच पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळणार आहे. महामंडळाच्या या भूखंडांवर उपलब्ध होणारे चटई क्षेत्र (महामंडळाच्या बांधकामासाठी राखीव असलेल्या ०.५ एफएसआय वगळता) व्यापारी तत्वावर वापरण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. यामुळे या भूखंडांचा व्यापारी विकास अधिक सुलभ होईल आणि महसूल वाढीला गती मिळेल, असा दावा करण्यात आला आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button