Gold Silver Price : जळगाव शहरात सोन्याच्या भावात आज पुन्हा ‘इतकी’ झाली वाढ…!

Gold Silver Price : जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात मोठे चढ-उतार दिसून आले आहेत. आज बुधवारी (ता.२८) देखील सोन्याचे भाव २१० ते २३० रूपयांनी वधारले. सोन्याच्या तुलनेत चांदीचे भाव मात्र स्थिरच होते. त्यात कोणतीच वाढ अथवा घट दुपारपर्यंत झाली नाही.

Gold Silver Price: In the city of Jalgaon, the price of gold has increased again today…

जळगावमध्ये काल मंगळवारी (ता.२७) जीएसटीसह २२ कॅरेट सोन्याचा भाव ६६,९४० रूपये आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव ७३,०३० रूपये प्रति तोळा होता. १८ कॅरेट सोन्याचा भाव सुद्धा ५४,७७० रूपये प्रति तोळा होता. त्यातुलनेत आज बुधवारी (ता.२८) जीएसटीसह २२ कॅरेट सोन्याचा भाव ६७,१५० रूपये आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव ७३,२५० रूपये प्रति तोळा इतका आहे. १८ कॅरेट सोन्याचा भाव सुद्धा ५४,९४० रूपये प्रति तोळा आहे.

जळगावमधील चांदीच्या भावात मात्र कोणतीच वाढ अथवा घट गुरूवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत नोंदविण्यात आली नव्हती. चांदीचे भाव ८८ हजार ५०० रूपये प्रतिकिलो कायम होते.

जळगावमधील सोने व चांदीचे भाव (ता.२८ ऑगस्ट)

२२ कॅरेट सोने : ६७,१५० रूपये प्रति तोळा
■ २४ कॅरेट सोने : ७३,२५० रूपये प्रति तोळा
१८ कॅरेट सोने : ५४,९४० रूपये प्रति तोळा
चांदी : ८८ हजार ५०० रूपये किलो

WhatsApp Group

Related Articles

Back to top button