जळगाव शहरात आज सोमवारी (ता.17) सोन्याचे दर धड्डाम कोसळले !
जळगाव टुडे । शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोने व चांदीच्या दरात काही दिवसांपासून मोठे चढ-उतार पाहण्यास मिळाले आहेत. प्राप्त माहितीनुसार, जळगावमध्ये आज सोमवारी (ता.17) देखील 22 तसेच 24 कॅरेट सोन्याचे दर हे 200 ते 220 रूपये प्रति 10 ग्रॅमने कमी झाले आहेत. तुलनेत चांदीचे दर मात्र आज स्थिरच आहेत. त्यात कोणतीही वाढ अथवा घट दिसून आलेली नाही. ( Gold & Silver Price )
जळगावमध्ये काल रविवारी (ता.16) रोजी जीएसटीसह प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर हा 66,500 रूपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर हा 72,550 रूपये इतका होता. तुलनेत आज सोमवारी (ता.17) जळगावमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 66,300 रूपये तसेच 24 कॅरेट सोन्याचा दर हा 72,330 रूपये प्रति 10 ग्रॅम असल्याचे दिसून आले आहे.
जळगावमध्ये रविवारी (ता.16) चांदीचे दर जीएसटीसह 91,000 रूपये प्रति किलो होते. त्या तुलनेत आज सोमवारी चांदीच्या दरात कोणतीच वाढ अथवा घट नोंदविण्यात आली नाही. त्यामुळे चांदीचे दर स्थिरच राहिले.
जळगावमधील 22/24 कॅरेट सोन्याचे दर (प्रति ग्रॅम)
● 17 जून- 6,630 / 7,233 रूपये
● 16 जून- 6,650 / 7,255 रूपये
● 15 जून- 6,650 / 7,255 रूपये
● 14 जून- 6,590 / 7,189 रूपये
● 13 जून- 6,615 / 7,216 रूपये
● 12 जून- 6,615 / 7,216 रूपये
● 11 जून- 6,585 / 7,184 रूपये
● 10 जून- 6,570 / 7,167 रूपये
● 09 जून- 6,570 / 7,167 रूपये
● 08 जून- 6,570 / 7,167 रूपये