मोठी बातमी…जळगावमध्ये चांदी 5 हजाराने घसरली; सोन्याचे दरही ‘इतके’ कमी झाले !
जळगाव टुडे । शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोने व चांदीच्या दरात काही दिवसांपासून मोठे चढ-उतार पाहण्यास मिळाले आहेत. प्राप्त माहितीनुसार, जळगावमध्ये गेल्या 10 दिवसात चांदीच्या दरात सुमारे 5 हजार रूपयांची घसरण झाली असून, सोन्याचे दर मात्र जेमतेम 120 रूपयांनी घटले आहेत. तरीही आज चांदीचे दर हे 91 हजार रूपये प्रतिकिलो आणि 24 कॅरेट सोन्याचे दर हे 72 हजार 550 रूपये प्रति 10 ग्रॅम इतके आहेत. ( Gold & Silver Price )
जळगावमध्ये गेल्या 10 दिवसांपूर्वी 07 जून रोजी जीएसटीसह प्रति ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर हा 6,760 रूपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर हा 7,325 रूपये इतका होता. तुलनेत आज रविवारी (ता.16) जळगावमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 6,650 रूपये तसेच 24 कॅरेट सोन्याचा दर हा 7,255 रूपये प्रति ग्रॅम असल्याचे दिसून आले आहे.
जळगावमध्ये 07 जून रोजी चांदीचे दर जीएसटीसह 96000 रूपये प्रति किलो होते. त्या तुलनेत आज रविवारी चांदीचे दर हे 91,000 रूपये प्रति किलोपर्यंत खाली आले आहेत. गेल्या 10 दिवसात चांदीचे दर हे तब्बल चार वेळा घसरले असून, हळूहळू चांदी 90 हजार रूपयांच्या खाली जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
जळगावमधील चांदीचे दर ( प्रति किलो )
● 16 जून- 91,000 रूपये
● 15 जून- 91,000 रूपये
● 14 जून- 90,500 रूपये
● 13 जून- 90,700 रूपये
● 12 जून- 91,300 रूपये
● 11 जून- 90,500 रूपये
● 10 जून- 91,700 रूपये
● 09 जून- 91,500 रूपये
● 08 जूनृ 91,500 रूपये
● 07 जून- 96,000 रूपये