जळगावमध्ये सोने व चांदीत पुन्हा मोठा बदल…जाणून घ्या आजचे दर कसे आहेत ?

जळगाव टुडे । शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोने व चांदीचे वाढलेले दर कमी होण्याची आशा असतानाच, आज शनिवारी (ता.15) पुन्हा सोने व चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली आहे. प्राप्त माहितीनुसार आजचे सोन्याचे दर हे प्रति 10 ग्रॅम 600 ते 650 रूपयांनी तर चांदीचे दर हे प्रति किलो सुमारे 500 रूपयांनी वधारले आहेत. ( Gold & Silver Price )

जळगावमध्ये शुक्रवारी (ता.14) जीएसटीसह 22 कॅरेट सोन्याचा दर हा 65 हजार 900 रूपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर हा 71 हजार 890 रूपये इतका प्रति 10 ग्रॅम होता. तुलनेत आज शनिवारी (ता.15) जळगावमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 66 हजार 500 रूपयांपर्यंत तसेच 24 कॅरेट सोन्याचा दर हा 72 हजार 550 रूपयांपर्यंत गेल्याचे दिसून आले आहे.

याशिवाय, जळगावमध्ये शुक्रवारी चांदीचे दर हे जीएसटीसह 90 हजार 500 रूपये प्रति किलो होते. त्या तुलनेत आज शनिवारी चांदीत सुमारे 500 रूपयांची वाढ झाल्याने चांदीचे दर हे 91,000 रूपये प्रति किलोपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. ग्राहकांना चांदीचे दर 90 हजाराच्या खाली येण्याची आशा होती. मात्र, त्यात आज पुन्हा वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button