जळगावमध्ये सोने व चांदी पुन्हा खाऊ लागले भाव…जाणून घ्या आजचे बुधवारचे दर
जळगाव टुडे । शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोने व चांदीचे वाढलेले दर कमी होण्याचे संकेत मिळत असतानाच, आज बुधवारी (ता.12) सोने व चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. प्राप्त माहितीनुसार आजचे सोन्याचे दर हे प्रति 10 ग्रॅम 320 रूपयांनी तर चांदीचे दर हे प्रति किलो सुमारे 800 रूपयांनी वधारले आहेत. ( Gold & Silver Price)
जळगावमध्ये मंगळवारी (ता.11) जीएसटीसह 22 कॅरेट सोन्याचा दर हा 65 हजार 850 रूपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर हा 71 हजार 840 रूपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. तुलनेत आज बुधवारी (ता.12) जळगावमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 66 हजार 150 रूपयांपर्यंत तसेच 24 कॅरेट सोन्याचा दर हा 72 हजार 160 रूपयांपर्यंत वधारल्याचे दिसून आले.
याशिवाय, जळगावमध्ये मंगळवारी चांदीचे दर जीएसटीसह 90 हजार 500 रूपये प्रति किलो होते. त्या तुलनेत आज बुधवारी सुमारे 800 रूपयांची वाढ झाल्याने चांदीचे दर हे 91 हजार 300 रूपये प्रति किलोपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. ग्राहकांना चांदीचे दर 90 हजाराच्या खाली येण्याची आशा होती. मात्र, त्यात आज पुन्हा वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.