Gold Silver Price : जळगावमध्ये सोन्याच्या भावात आज ‘इतकी’ झाली घसरण; जाणून घ्या आजची स्थिती…!

Gold Silver Price : जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोन्याच्या भावात बुधवारी (ता.२१) अचानक तेजी निर्माण झाल्याचे दिसून आले होते. मात्र, आज गुरूवारी सोन्याचे भाव पुन्हा ३०० ते ३३० रूपयांनी खाली आले. दोन दिवसातील चढ-उतार लक्षात घेता ग्राहकांमध्येही त्यामुळे सोने खरेदीबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली.

Gold Silver Price: ‘So Much’ Fall in Gold Price in Jalgaon; Know today’s status…!

जळगावमध्ये काल बुधवारी (ता.२१) जीएसटीसह २२ कॅरेट सोन्याचा भाव ६७,१०० रूपये आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव ७३,२०० रूपये प्रति तोळा इतका होता. १८ कॅरेट सोन्याचा भाव सुद्धा ५४,९०० रूपये प्रति तोळा होता. त्यातुलनेत आज गुरूवारी (ता.२२) जीएसटीसह २२ कॅरेट सोन्याचा भाव ६६,८०० रूपये आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव ७२,८७० रूपये प्रति तोळा इतका आहे. १८ कॅरेट सोन्याचा भाव सुद्धा ५४,६६० रूपये प्रति तोळा आहे.

जळगावमधील चांदीच्या भावात मात्र कोणतीच वाढ अथवा घट गुरूवारी दुपारी एक वाजेपर्यंत नोंदविण्यात आली नाही. चांदीचे भाव ८७ हजार रूपये प्रतिकिलो कायम होते.

जळगावमधील सोने व चांदीचे भाव (ता.२२ ऑगस्ट )

२२ कॅरेट सोने : ६६,८०० रूपये प्रति तोळा
२४ कॅरेट सोने : ७२,८७० रूपये प्रति तोळा
१८ कॅरेट सोने : ५४,६६० रूपये प्रति तोळा
चांदी : ८७ हजार रूपये किलो

WhatsApp Group

Related Articles

Back to top button