Gold Silver Price : जळगावमध्ये सोन्याचे भाव पुन्हा एकदा उसळले; जाणून घ्या आजची स्थिती…!
Gold Silver Price : जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोन्याचे भाव काही दिवसांपूर्वी कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. मात्र,आज बुधवारी (ता.२१) पुन्हा सोन्याच्या भावाने मोठी उसळी घेतल्याचे दिसून आले. सोन्याचे भाव एकाच दिवसत ५०० ते ५५० रूपये प्रति तोळा (१० ग्रॅम) वधारल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणीच पळाले.
Gold Silver Price: Big bounce in gold price again in Jalgaon; Find out today’s prices!
जळगावमध्ये काल मंगळवारी (ता.२०) जीएसटीसह २२ कॅरेट सोन्याचा भाव ६६,६०० रूपये तसेच २४ कॅरेट सोन्याचा भाव ७२,६५० रूपये प्रति तोळा होता. त्या तुलनेत आज बुधवारी (ता.२१) जीएसटीसह २२ कॅरेट सोन्याचा भाव ६७,१०० रूपये आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव ७३,२०० रूपये प्रति तोळा इतका आहे. अशाच प्रकारे १८ कॅरेट सोन्याचा भाव मंगळवारी ५४,४९० रूपये होता, आज बुधवारी तो ५४,९०० रूपये प्रति तोळा आहे.
जळगावमधील चांदीच्या भावात मात्र कोणतीच वाढ अथवा घट बुधवारी दुपारी एक वाजेपर्यंत नोंदविण्यात आली नव्हती. चांदीचे भाव ८७ हजार रूपये प्रतिकिलो कायम होते.
जळगावमधील सोने व चांदीचे भाव (ता.२१ ऑगस्ट )
२२ कॅरेट सोने : ६७,१०० रूपये प्रति तोळा
२४ कॅरेट सोने : ७३,२०० रूपये प्रति तोळा
चांदी : ८७ हजार रूपये किलो