Gold Silver Price : सोने व चांदीत मोठी पडझड; जाणून घ्या जळगावमध्ये आज कशी आहे स्थिती ?

Gold Silver Price : जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सोने व चांदीच्या भावात मोठे चढ-उतार दिसून आले आहेत. आज बुधवारी (ता.०७) देखील जळगावमध्ये सोन्याच्या भावात ४०० ते ४४० रूपयांनी घसरण झाली. चांदीचे भाव देखील प्रतिकिलो मागे सुमारे ५५०० रूपये रूपयांनी खाली आले.

Gold Silver Price: Big fall in gold and silver; Know how is the situation in Jalgaon today?

जळगावमध्ये काल मंगळवारी जीएसटीसह २२ कॅरेट सोन्याचा भाव ६३,९०० रूपये आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव ६९,७१० रूपये प्रति १० ग्रॅम होता. तुलनेत आज बुधवारी जीएसटीसह २२ कॅरेट सोन्याचा भाव ६३,५०० रूपये आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव ६९,२७० रूपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. १८ कॅरेट सोन्याचा भाव मंगळवारी ५२,२८० रूपये होता, तर आज ५१,९६० रूपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. १८ कॅरेट सोन्यातही ३२० रूपयांची घसरण झाली आहे.

जळगावमध्ये मंगळवारी चांदीचा भाव जीएसटीसह ८७,५०० रूपये प्रतिकिलो होता. तुलनेत आज बुधवारी सुमारे ५५०० रूपयांची घट झाल्याने चांदीचा भाव ८२ हजार रूपये प्रति किलोपर्यंत खाली आल्याचे दिसून आले.

जळगावमधील सोने व चांदीचा भाव (ता.०७ ऑगस्ट)

सोने/चांदीभाव
२२ कॅरेट सोने६३,५०० रूपये (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट सोने६९,२७० रूपये (प्रति १० ग्रॅम)
चांदी८२,००० रूपये (प्रति किलो)

WhatsApp Group

Related Articles

Back to top button