जळगावमध्ये चांदीने नाव काढले…गेल्या १० दिवसातच ‘इतक्या’ रूपयांची भावात झाली वाढ !
जळगाव टुडे । जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सोने व चांदीच्या भावात मोठे चढ-उतार दिसून आले आहेत. दरम्यान, गेल्या १० दिवसांच्या कालावधीत विशेषतः चांदीच्या भावात सुमारे २४०० रूपयांची वाढ किलोमागे झाल्याचे निदर्शनास आले आहे. तुलनेत सोन्याच्या भावात मात्र फार दखलपात्र वाढ झालेली नाही. ( Gold Silver Price )
Gold Silver Price
जळगावमध्ये दहा दिवसांपूर्वी म्हणजे ०४ जुलै रोजी २२ कॅरेट सोन्याचा भाव जीएसटीसह ६,७०० रूपये आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव हा ७,३०९ रूपये प्रति ग्रॅम होता. तुलनेत आज शनिवारी ( ता.१३ जुलै ) जळगावमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव हा ६,७६१ रूपये तसेच २४ कॅरेट सोन्याचा भाव हा ७,३७६ रूपये प्रति ग्रॅम आहे. आजचे आणि दहा दिवसांपूर्वीचे भाव लक्षात घेतले तर २२ कॅरेट सोन्यात जेमतेम ६१ रूपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे, तर २४ कॅरेट सोन्याच्या भावात ६७ रूपयांची नाममात्र वाढ नोंदविण्यात आली आहे.
चांदी मात्र चांगलीच तोऱ्यात
जळगावमध्ये दहा दिवसांपूर्वी म्हणजे ०४ जुलै रोजी चांदीचा भाव जीएसटीसह ९३,००० रूपये प्रति किलो होता. त्यातुलनेत आज शनिवारी ( ता.१३ ) जळगावमध्ये चांदीचा भाव ९५ हजार ४०० रूपये प्रति किलो इतका आहे. म्हणजे चांदीच्या भावात गेल्या १० दिवसांच्या कालावधीत सुमारे २४०० रूपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
जळगावमधील सोने व चांदीचा भाव
■ २२ कॅरेट सोने
०४ जुलै- ६,७०० रूपये (प्रति ग्रॅम)
१३ जुलै- ६,७६१ रूपये (प्रति ग्रॅम)
■ २४ कॅरेट सोने
०४ जुलै- ७,३०९ रूपये (प्रति ग्रॅम)
१३ जुलै- ७,३७६ रूपये (प्रति ग्रॅम)
■ चांदी
०४ जुलै- ९३,००० रूपये (प्रति किलो)
१३ जुलै- ९५,४०० रूपये (प्रति किलो)