जळगावमध्ये सोने महागले, चांदी झाली एकदम स्वस्त…जाणून घ्या आजचे दर
जळगाव टुडे । शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोने व चांदीचे वधारलेले दर पूर्वपदावर येण्याचे संकेत मिळत असतानाच, आज मंगळवारी (ता.11) सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली. परंतु, चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. प्राप्त माहितीनुसार सोन्याचे दर हे प्रति 10 ग्रॅम जवळपास 170 रूपयांनी वधारले, तर चांदीचे दर हे प्रति किलो सुमारे 1200 रूपयांनी घसरले आहेत. ( Gold & Silver Price)
जळगावमध्ये सोमवारी (ता.10) जीएसटीसह प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर हा 65 हजार 700 रूपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर हा 71 हजार 670 रूपये इतका होता. तुलनेत आज मंगळवारी (ता.11) जळगावमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 65 हजार 850 रूपयांपर्यंत तसेच 24 कॅरेट सोन्याचा दर हा 71 हजार 840 रूपयांपर्यंत वधारला.
जळगावमध्ये सोमवारी चांदीचे दर जीएसटीसह 91 हजार 700 रूपये प्रति किलो होते. त्या तुलनेत आज मंगळवारी सुमारे 1200 रूपयांची घसरण झाल्याने चांदीचे दर 90 हजार 500 रूपये प्रति किलोपर्यंत खालावले आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून, विशेषतः चांदीच्या खरेदीसाठी अनेकांनी गर्दी केली आहे.