सोने-चांदी ऐकतच नाही…जाणून घ्या, जळगाव शहरात आज कसे आहेत भाव ?
जळगाव टुडे । शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सोने व चांदीच्या भावात मोठे चढ-उतार सुरू आहेत. आज गुरूवारी (ता. ०४) देखील सोने-चांदीच्या भावात मोठी तेजी दिसून आली. प्राप्त माहितीनुसार बुधवारच्या तुलनेत आज सोन्याचे भाव ६५० ते ७१० रूपयांनी वधारले आहेत. चांदीच्या भावातही प्रतिकिलो सुमारे १५०० रूपयांची वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. ( Gold Silver Price )
जळगावमध्ये काल बुधवारी (ता.०३) जीएसटीसह २२ कॅरेट सोन्याचा भाव हा ६६,३५० रूपये आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव हा ७२,३८० रूपये प्रति १० ग्रॅम इतका होता. तुलनेत आज गुरूवारी जळगावमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव हा ६७,००० रूपये तसेच २४ कॅरेट सोन्याचा भाव हा ७३,०९० रूपये प्रति १० ग्रॅम होता. १८ कॅरेट सोन्याचा भाव देखील आज ५४,८२० रूपये प्रति १० ग्रॅम होता.
याशिवाय जळगावमध्ये बुधवारी (ता.०३) चांदीचा भाव जीएसटीसह ९१,५०० रूपये प्रति किलो होता. त्या तुलनेत आज गुरूवारी चांदीच्या भावात १५०० रूपयांची वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे चांदी ९३,००० रूपये प्रति किलोपर्यंत जाऊन पोहोचली.
जळगावमधील सोने व चांदीचा भाव ( ०४ जुलै )
■ २२ कॅरेट सोने- ६७,००० रूपये (प्रति १० ग्रॅम)
■ २४ कॅरेट सोने- ७३,०९० रूपये (प्रति १० ग्रॅम)
■ १८ कॅरेट सोने- ५४,८२० रूपये (प्रति १० ग्रॅम)
■ चांदी- ९३,००० रूपये (प्रति किलो)