जून महिन्यात सोने व चांदीचे भाव ‘इतके’ घटले…जळगावमध्ये कशी होती स्थिती ?
जळगाव टुडे । शहरातील सुवर्ण बाजारपेठेत जून महिन्यात सोने व चांदीच्या भावात मोठे चढ-उतार पाहण्यास मिळाले आहे. प्राप्त माहितीनुसार महिनाभरात जळगावमध्ये सोन्याचे भाव हे प्रति 10 ग्रॅम सरासरी 250 ते 270 रूपयांनी खालावल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे चांदीच्या भावात देखील प्रति किलो सुमारे 3500 रूपयांची घट झाल्याचे दिसून आले आहे. ( Gold Silver Price )
जळगावच्या बाजारपेठेत 01 जून रोजी प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव जीएसटीसह 66,500 रूपये होता, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 72,550 रूपये होता. त्यातुलनेत आज 30 जून रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,250 आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,280 रूपये इतका आहे. त्यामुळे 22 कॅरेट सोन्यात महिनाभरात जवळपास 250 रूपयांची घट झाली आहे आणि 24 कॅरेट सोन्याच्या भावात 270 रूपयांची घट झाल्याचे निदर्शनास आलेले आहे.
याशिवाय, जळगावमध्ये 01 जून रोजी चांदीचा भाव जीएसटीसह 93,500 रूपये प्रति किलो होते. त्यातुलनेत आज 30 जून रोजी चांदीचा भाव 90 हजार रूपये किलो इतका आहे. म्हणजेच जवळपास 3500 रूपयांनी चांदीचे भाव महिनाभरात उतरले आहेत.
जळगावमधील सोन्याचे भाव (22/24 कॅरेट)
■ 30 जून- 66,250 / 72,280 रूपये
■ 29 जून- 66,250 / 72,280
■ 28 जून- 66,150 / 72,160
■ 27 जून- 65,750 / 71,730
■ 26 जून- 66,000 / 72,000
■ 25 जून- 66,250 / 72,230
■ 24 जून- 66,250 / 72,230
■ 23 जून- 66,350 / 72,380
■ 22 जून- 66,350 / 72,380
■ 21 जून- 67,150 / 73,250