सोन्याचे भाव आणखी वाढले…जाणून घ्या, जळगावमध्ये आज कसे आहेत भाव ?

जळगाव टुडे । शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात मोठी तेजी-मंदी अनुभवण्यास मिळाली आहे. आज शनिवारी (ता.२९) देखील सोन्याच्या भावात तेजी दिसून आली. प्राप्त माहितीनुसार शुक्रवारच्या तुलनेत आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १०० ते १२० रूपयांनी वधारला. मात्र, चांदीच्या भावात कोणताच बदल झाला नाही. चांदीचे भाव तीन दिवसांपासून स्थिरच आहेत. ( Gold Silver Price )

जळगावमध्ये काल शुक्रवारी (ता.२८) जीएसटीसह प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव हा ६५,१५० रूपये आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव हा ७२,१६० रूपये इतका होता. तुलनेत आज शनिवारी जळगावमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव हा ६६,२५० रूपये तसेच २४ कॅरेट सोन्याचा भाव हा ७२,२८० रूपये प्रति १० ग्रॅमपर्यंत गेल्याचे दिसून आले. १८ कॅरेट सोन्याचा भाव देखील ५४,२१० रूपये होता.

याशिवाय जळगावमध्ये शुक्रवारी (ता.२८) चांदीचा भाव जीएसटीसह ९०,००० रूपये प्रति किलो होता. त्या तुलनेत आज शनिवारी चांदीच्या भावात कोणतीच वाढ अथवा घट नोंदवण्यात आली नाही. त्यामुळे चांदीचा भाव ९०,००० रूपये प्रति किलोपर्यंत स्थिर होता.

जळगावमधील सोने व चांदीचा भाव (२९ जून)
२२ कॅरेट सोने- ६६,२५० रूपये (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट सोने- ७२,२८० रूपये (प्रति १० ग्रॅम)
१८ कॅरेट सोने- ५४,२१० रूपये (प्रति १० ग्रॅम)
चांदी- ९०,००० रूपये (प्रति किलो)

WhatsApp Group

Related Articles

Back to top button