सोन्याने केली बघा कमाल…जाणून घ्या, जळगाव शहरात आज कसे आहेत भाव ?
जळगाव टुडे । शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात मोठे स्थित्यंतर अनुभवण्यास मिळाले आहे. आज शुक्रवारी (ता. २८) देखील सोन्याच्या भावात मोठी तेजी दिसून आली. प्राप्त माहितीनुसार गुरूवारच्या तुलनेत आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ४०० ते ४३० रूपयांनी वधारला आहे. मात्र, चांदीच्या भावात कोणताच बदल झालेला नाही. ( Gold Silver Price )
जळगावमध्ये काल गुरूवारी (ता. २७) जीएसटीसह प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव हा ६५,७५० रूपये आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव हा ७१,७३० रूपये इतका होता. तुलनेत आज शुक्रवारी जळगावमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव हा ६६,१५० रूपये तसेच २४ कॅरेट सोन्याचा भाव हा ७२,१६० रूपये प्रति १० ग्रॅमपर्यंत गेल्याचे दिसून आले. १८ कॅरेट सोन्याचा भाव देखील ५४,१२० रूपये होता.
याशिवाय जळगावमध्ये गुरूवारी (ता.२७) चांदीचा भाव जीएसटीसह ९०,००० रूपये प्रति किलो होता. त्या तुलनेत आज शुक्रवारी चांदीच्या भावात कोणतीच वाढ अथवा घट नोंदवण्यात आली नाही. त्यामुळे चांदीचा भाव ९०,००० रूपये प्रति किलोपर्यंत स्थिर होता.
जळगावमधील सोने व चांदीचा भाव (२८ जून)
■ २२ कॅरेट सोने- ६६,१५० रूपये (प्रति १० ग्रॅम)
■ २४ कॅरेट सोने- ७२,१६० रूपये (प्रति १० ग्रॅम)
■ १८ कॅरेट सोने- ५४,१२० रूपये (प्रति १० ग्रॅम)
■ चांदी- ९०,००० रूपये (प्रति किलो)