सोने व चांदीने नाव काढले…जाणून घ्या, जळगाव शहरात आज कसे आहेत भाव ?
जळगाव टुडे । शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात मोठे चढ-उतार अनुभवण्यास मिळाले आहेत. आज गुरूवारी (ता. २७) देखील सोन्याच्या भावात अस्थिरता दिसून आली आहे. प्राप्त माहितीनुसार बुधवारच्या तुलनेत आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम २५० ते २७० रूपयांनी खालावला आहे. मात्र, चांदीच्या भावात कोणताच बदल झालेला नाही. ( Gold Silver Price )
जळगावमध्ये काल बुधवारी (ता. २६) जीएसटीसह प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव हा ६६,००० रूपये आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव हा ७२,००० रूपये इतका होता. तुलनेत आज गुरूवारी जळगावमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव हा ६५,७५० रूपये तसेच २४ कॅरेट सोन्याचा भाव हा ७१,७३० रूपये प्रति १० ग्रॅमपर्यंत खाली आल्याचे दिसून आले आहे.
याशिवाय जळगावमध्ये बुधवारी (ता.२६) चांदीचा भाव जीएसटीसह ९०,००० रूपये प्रति किलो होता. त्या तुलनेत आज गुरूवारी चांदीच्या भावात कोणतीच वाढ अथवा घट नोंदवण्यात आली नाही. त्यामुळे चांदीचा भाव ९०,००० रूपये प्रति किलोपर्यंत स्थिर होता.
जळगावमधील सोने व चांदीचा भाव (२७ जून)
■ २२ कॅरेट सोने- ६५,७५० रूपये (प्रति १० ग्रॅम)
■ २४ कॅरेट सोने- ७१,७३० रूपये (प्रति १० ग्रॅम)
■ चांदी- ९०,००० रूपये (प्रति किलो)