सोने-चांदी पुन्हा धड्डाम…जळगाव शहरात आज बुधवारी असे आहेत भाव !
जळगाव टुडे । शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात मोठे चढ-उतार अनुभवण्यास मिळाले आहेत. आज बुधवारी (ता.२६) देखील सोने व चांदीचे भाव हे बऱ्याचअंशी कमी झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार मंगळवारच्या तुलनेत सोन्याचा भाव आज प्रति १० ग्रॅम २५० रूपयांनी तर चांदीचा भाव प्रतिकिलो १००० रूपयांनी कमी झाल्याचे दिसून आले आहे. ( Gold Silver Price )
जळगावमध्ये काल मंगळवारी (ता.२५) जीएसटीसह प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव हा ६६,२५० रूपये आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव हा ७२,२३० रूपये इतका होता. तुलनेत आज बुधवारी जळगावमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव हा ६६,००० रूपये तसेच २४ कॅरेट सोन्याचा भाव हा ७२,००० रूपये प्रति १० ग्रॅमपर्यंत खाली आल्याचे दिसून आले आहे.
याशिवाय जळगावमध्ये मंगळवारी (ता.२५) चांदीचा भाव जीएसटीसह ९१,००० रूपये प्रति किलो होता. त्या तुलनेत आज बुधवारी चांदीच्या भावात सुमारे १००० रूपयांची घट नोंदविण्यात आली असून, त्यामुळे चांदीचा भाव ९०,००० रूपये प्रति किलोपर्यंत खाली आलेला आहे.
जळगावमधील सोने व चांदीचा भाव (२६ जून)
■ २२ कॅरेट सोने- ६६,००० रूपये (प्रति १० ग्रॅम)
■ २४ कॅरेट सोने- ७२,००० रूपये (प्रति १० ग्रॅम)
■ चांदी- ९०,००० रूपये (प्रति किलो)