सोने जैसे थे, चांदी उतरली…जाणून घ्या, जळगावमधील आजचे मंगळवारचे भाव !
जळगाव टुडे । शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात मोठे चढ-उतार सुरू होते. त्यातुलनेत आज मंगळवारी (ता. २५) सोन्याचे भाव हे स्थिरच राहिले. त्यात दुपारी बारापर्यंत कोणतीच वाढ अथवा घट झालेली नव्हती. कालच्या तुलनेत चांदीचा भाव मात्र आज सुमारे ७०० रूपये प्रति किलोने कमी झाल्याचे दिसून आले. ( Gold & Silver Price )
जळगावमध्ये काल सोमवारी (ता. २४) जीएसटीसह प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव हा ६६,२५० रूपये आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव हा ७२,२३० रूपये इतका होता. तुलनेत आज मंगळवारी जळगावमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव हा ६६,२५० रूपये तसेच २४ कॅरेट सोन्याचा भाव हा ७२,२३० रूपये प्रति १० ग्रॅम कायम असल्याचे दिसून आले.
याशिवाय जळगावमध्ये सोमवारी (ता. २४) चांदीचा भाव जीएसटीसह ९१,७०० रूपये प्रति किलो होता. त्या तुलनेत आज मंगळवारी चांदीच्या भावात सुमारे ७०० रूपयांची घट नोंदविण्यात आली. त्यामुळे चांदीचा भाव ९१,००० रूपये प्रति किलोपर्यंत खाली आला.
जळगावमधील सोने व चांदीचा भाव (२५ जून)
■ २२ कॅरेट सोने- ६६,२५० रूपये (प्रति १० ग्रॅम)
■ २४ कॅरेट सोने- ७२,२३० रूपये (प्रति १० ग्रॅम)
■ चांदी- ९१,००० रूपये (प्रति किलो)