सोने व चांदी पुन्हा रिव्हर्स…जाणून घ्या, जळगाव शहरातील आजचे भाव !
जळगाव टुडे । शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शनिवारी (ता.२२) सोने व चांदीत पुन्हा मोठी पडझड पाहण्यास मिळाली होती. त्यानंतर आज सोमवारी (ता.२३) देखील प्रति १० ग्रॅम सोन्याचे भाव हे सुमारे १०० ते १५० रूपयांनी खालावले आहेत. कालच्या तुलनेत चांदीचे भाव सुद्धा आज सुमारे ३०० रूपये प्रति किलोने कमी झाल्याचे दिसून आले आहे. ( Gold & Silver Price )
जळगावमध्ये काल रविवारी (ता.२३) जीएसटीसह प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव हा ६६,३५० रूपये आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव हा ७२,३८० रूपये इतका होता. तुलनेत आज सोमवारी जळगावमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव हा ६६,२५० रूपये तसेच २४ कॅरेट सोन्याचा भाव हा ७२,२३० रूपये प्रति १० ग्रॅम असल्याचे दिसून आले आहे.
याशिवाय जळगावमध्ये रविवारी (ता.२३) चांदीचा भाव जीएसटीसह ९२,००० रूपये प्रति किलो होता. त्या तुलनेत आज सोमवारी चांदीच्या भावात सुमारे ३०० रूपयांची घट नोंदविण्यात आली. त्यामुळे चांदीचा भाव ९१,७०० रूपये प्रति किलोपर्यंत खाली आला आहे.
जळगावमधील सोने व चांदीचा भाव (२४ जून)
● २२ कॅरेट सोने- ६६,२५० रूपये (प्रति १० ग्रॅम)
● २४ कॅरेट सोने- ७२,२३० रूपये (प्रति १० ग्रॅम)
● चांदी- ९१,७०० रूपये (प्रति किलो)