जळगावमध्ये सोने-चांदी जमिनीवर…दर घसरल्याने ग्राहकांची झुंबड !
जळगाव टुडे । शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दर वाढत असल्याने सोने व चांदीने चांगलेच नाव कमावले होते. मात्र, शनिवारी (ता.08) अचानक सोने व चांदीचे दर एकदम जमिनीवर आल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. प्राप्त माहितीनुसार आज शनिवारी सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम तब्बल 2000 हजार रूपयांची तर चांदीच्या दरात प्रति किलो सुमारे 4500 रूपयांची घसरण झाली आहे. ( Gold & Silver Price)
शुक्रवारी जळगावमध्ये शुक्रवारी (ता.07 जून) 22 कॅरेट सोन्याचा दर हा जीएसटीसह 67 हजार 600 रूपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर हा 73 हजार 750 रूपये इतका होता. तुलनेत आज शनिवारी (ता.08) जळगावमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर 65 हजार 700 रूपयांपर्यंत खाली आले आहेत. तसेच 24 कॅरेट सोन्याचे दर हे 71 हजार 670 रूपयांपर्यंत खाली आले आहेत.
जळगावमध्ये शुक्रवारी चांदीचे दर जीएसटीसह 96 हजार रूपये प्रति किलो होते. त्या तुलनेत आज शनिवारी सुमारे 4500 रूपयांची घसरण झाल्याने चांदीचे दर 91 हजार 500 रूपये प्रति किलोपर्यंत खालावले आहेत. 31 मे रोजी 96 हजार 500 रूपये किलो असलेले चांदीचे दर आजच्या घडीला साधारणतः 5000 रूपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून, सोने व चांदीच्या खरेदीसाठी अनेकांनी गर्दी केली आहे.