सोने व चांदीच्या भावात पुन्हा तेजी येण्याची शक्यता, जाणून घ्या आजचे भाव
Jalgaon Today : आज रविवारी (ता.05) शुद्ध 24 कॅरेट सोन्याची किंमत 71,830 रुपये प्रति 10 ग्रॅम तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत सुमारे 65,850 रुपये आहे. याउलट, चांदीचा बाजार वाढून तो 83,000 रुपये प्रति किलोग्रॅमपर्यंत पोहोचला आहे. दरम्यान, अक्षय्य तृतिया तोंडावर असल्याने पुढील आठवड्यात सोन्याची खरेदी वाढून बाजारभावात आणखी थोडी सुधारणा शक्य आहे. (Gold Rate)
अक्षय्य तृतीयेचे वेध लागताच समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक म्हणून अनेकजण सोने व चांदीच्या दागिन्यांची खरेदी करण्यासाठी उत्साहित होतात. त्यामुळे आगामी काळात चांदी व सोन्याच्या बाजारात पुन्हा एकदा तेजी निर्माण होण्याची चिन्हे आहेत. प्राप्त माहितीनुसार सध्या देशात 1 किलो चांदीची किंमत 83,500 रुपये आहे, तर 100 ग्रॅम चांदीची किंमत 8350 रुपये इतकी आहे.
05 मे- 10 ग्रॅम सोन्याचे विविध शहरातील भाव (22 कॅरेट/24 कॅरेट)
■ दिल्ली- 66000/71980 रूपये
■ मुंबई- 65850/71830 रूपये
■ अहमदाबाद- 65900/71880 रूपये
■ चेनैई- 66000/72000 रूपये
■ कोलकाता- 65850/71830 रूपये
■ लखनऊ- 66000/71980 रूपये
■ बंगळुरू- 65850/71830 रूपये
■ जयपूर- 66000/71980 रूपये
■ पटना- 65900/71880 रूपये
■ भुवनेश्वर- 65850/71830 रूपये
■ हैदराबाद- 65850/71830 रूपये