गुढीपाडव्याच्या दिवशी सोने नवीन उंचीवर पोहोचले, जाणून घ्या विविध शहरातील भाव
Gold Rate : गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्याच्या भावाने नवीन उंची गाठल्याचे दिसून आले. जून 2024 साठी MCX सोन्याचे फ्युचर्स दर 71,026 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उघडले असून, 71,125 रुपयांच्या उंचीवर एक नवीन उच्चांक त्याने गाठला आहे. दरम्यान, चांदीचा दर 81,971 रुपये प्रति किलोग्रॅमवर उघडला आणि दिवसभरातील उच्चांक त्याने गाठला. देशातील मुंबई, पुणे तसेच दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद आदी बऱ्याच प्रमुख शहरांमधील सोन्याचे भाव आज आपण जाणून घेणार आहोत.
09 एप्रिल : विविध शहरातील सोन्याचे भाव (22 कॅरेट / 24 कॅरेट)
● दिल्ली- 65,900 / 71,880 रूपये
● मुंबई- 65,750 / 71,730 रूपये
● कोलकाता- 65,750 / 71,730 रूपये
● बंगळूर- 65,750 / 71,730 रूपये
● हैदराबाद- 65,750 / 71,730 रूपये
● कोची- 65,750 / 74,730 रूपये
● पुणे- 65,750 / 71,730 रूपये
● अहमदाबाद- 65,800 / 71,780 रूपये
● चेनैई- 66,700 / 72,760 रूपये