सोन्याने दिला झटका…जाणून घ्या, जळगाव शहरात आज कसे आहेत भाव ?
जळगाव टुडे । शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सोने व चांदीच्या भावात मोठी तेजी-मंदी दिसून आली आहे. दरम्यान, आज शुक्रवारी (ता.१२) देखील सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅम ३०० ते ३३० रूपये तर प्रति १०० ग्रॅम ३००० ते ३३०० रूपयांनी कडाडले आहेत. सोन्याचे भाव कमी होण्याची आशा बाळगून असलेल्या ग्राहकांना त्यामुळे मोठा झटका बसला आहे. ( Gold Silver Price )
Gold Silver Price
जळगावमध्ये काल गुरूवारी (ता.११) जीएसटीसह प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव हा ६७,३०० रूपये आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव हा ७३,४२० रूपये इतका होता. तुलनेत आज शुक्रवारी जळगावमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव हा ६७,६०० रूपये तसेच २४ कॅरेट सोन्याचा भाव हा ७३,७५० रूपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. १८ कॅरेट सोन्याचा भाव देखील आज ५५,३१० रूपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. त्यात सुद्धा गुरूवारच्या तुलनेत २५० रूपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
याशिवाय जळगावमध्ये गुरूवारी चांदीचा भाव जीएसटीसह ९५,५०० रूपये प्रति किलो होता. त्या तुलनेत आज शुक्रवारी चांदीच्या भावात कोणतीच वाढ नोंदवण्यात आली नाही. त्यामुळे चांदीचा भाव ९५,५०० रूपये प्रति किलोप्रमाणे स्थिर आहे.
जळगावमधील सोने व चांदीचा भाव ( १२ जुलै )
■ २२ कॅरेट सोने- ६७,६०० रूपये (प्रति १० ग्रॅम)
■ २४ कॅरेट सोने- ७३,७५० रूपये (प्रति १० ग्रॅम)
■ १८ कॅरेट सोने- ५५,३१० रूपये (प्रति १० ग्रॅम)
■ चांदी- ९५,५०० रूपये (प्रति किलो)