जळगावमध्ये खळबळ…सोने व चांदीच्या दरात आज अचानक झाली मोठी वाढ !
जळगाव टुडे । शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोमवारी (ता.27) चांदीचा दर हा जीएसटीसह 93,000 प्रति किलोपर्यंत होता. त्यात आज मंगळवारी (ता.28) सुमारे 3500 रूपयांची वाढ झाल्याने चांदीचे दर हे 96 हजार 500 रूपये प्रति किलोपर्यंत जाऊन पोहोचले. दुसरीकडे सोन्याच्या दरातही आज मंगळवारी प्रति 10 ग्रॅम 200 ते 220 रूपयांची वाढ नोंदविण्यात आली. त्यामुळे ग्राहकांमध्ये खळबळ उडाली. (Gold And Silver Price)
जळगावमध्ये 22 मे रोजी चांदीचे दर हे 95,800 रूपये प्रति किलोपर्यंत होते. त्यानंतर चांदीच्या दरात पडझड सुरू झाली, ती शनिवारपर्यंत कायमच होती. त्यामुळे चांदीच्या खरेदीसाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांना काहीअंशी दिलासा देखील मिळाला होता. परंतु, सोमवारी (ता.27) पुन्हा चांदीचे दर 1500 रूपये प्रति किलोने वधारले. त्यानंतर आज मंगळवारी पुन्हा चांदीच्या दरात तब्बल 3500 रूपयांची वाढ झाल्याचे निदर्शनास आले.
सोन्याच्या दरातही हळूहळू वाढ
सोमवारी (ता.27) जळगावमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर हा 6,665 रूपये प्रतिग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,271 रूपये प्रति ग्रॅम इतका होता. सोमवारच्या तुलनेत आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 200 रूपये तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 220 रूपयांची वाढ झाल्याचे दिसून आले. त्यानुसार आज मंगळवारी जळगावमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर हा 6,685 रूपये प्रतिग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,293 रूपये प्रति ग्रॅम इतका आहे.