जळगावमध्ये सोने व चांदीच्या दरात झाला ‘हा’ मोठा बदल; जाणून घ्या आजचे दर
जळगाव टुडे । शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शुक्रवारी (ता.24) चांदीचा दर हा जीएसटीसह 92000 रूपये प्रति किलोपर्यंत होता.आज शुक्रवारी (ता.21) प्रति किलोमागे सुमारे 500 रूपयांची घट होऊन चांदीचे दर 91 हजार 500 रूपयांपर्यंत स्थिरावले. मात्र, कालच्या तुलनेत सोन्याच्या दरात आज कोणतीच घट अथवा वाढ झाल्याचे दिसून आले नाही. (Gold And Silver Price)
जळगावमध्ये 22 मे रोजी चांदीचे दर 95,800 रूपये प्रति किलोपर्यंत होते. त्यानंतर चांदीच्या दरात पडझड सुरू झाली, ती आजतागायत कायमच आहे. चांदीमध्ये 23 मे रोजी प्रतिकिलो 3300 रूपयांची, 24 मे रोजी 500 रूपयांची आणि आज शनिवारी (ता.25) पुन्हा 500 रूपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे चांदीच्या खरेदीसाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांना काहीअंशी दिलासा देखील मिळाला आहे.
सोन्याचे दर मात्र स्थिर !
दरम्यान,आज शनिवारी (ता.25) जळगावमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर हा 6,640 रूपये प्रतिग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,244 रूपये प्रति ग्रॅम इतका आहे. कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात कोणतीच घट अथवा वाढ झाल्याचे निदर्शनास आलेले नाही. जळगावमध्ये दहा दिवसांपूर्वी म्हणजेच 16 मे रोजी 22 कॅरेट सोन्याचे दर हे जीएसटीसह 6,830 रूपये प्रति ग्रॅम होते, तर 24 कॅरेट सोन्याचे दर हे 7402 प्रति ग्रॅम होते. त्यातुलनेत आजचे दर हे फक्त 145 ते 158 रूपयांनी जास्त आहेत.