जळगावमध्ये सोने व चांदीच्या दरात आज शुक्रवारी पुन्हा घसरण, जाणून घ्या ताजे दर
जळगाव टुडे । शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आज शुक्रवारी (ता.24) सोने व चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाल्याचे दिसून आले. प्राप्त माहितीनुसार सोन्याच्या दरात प्रतिग्रॅम जवळपास 90 रूपये आणि चांदीच्या दरात सुद्धा प्रतिकिलो सुमारे 500 रूपयांची घसरण झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असलेले सोने व चांदीचे दर काहीअंशी कमी झाल्याने ग्राहकांनाही आता थोडाफार दिलासा मिळू शकणार आहे. (Gold And Silver Price)
जळगावमध्ये गुरूवारी (ता.23) जीएसटीसह 22 कॅरेट सोन्याचे दर हे 6730 रूपये प्रति ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याचे दर हे 7342 रूपये प्रति ग्रॅम होते. त्या तुलनेत आज शुक्रवारी 22 कॅरेट सोन्याचे दर हे 6640 रूपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचे दर हे 7244 रूपये प्रति ग्रॅम आहेत.
दरम्यान, जळगावमधील चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. गुरुवारी जळगावमधील चांदीचे दर हे जीएसटीसह 92 हजार 500 रूपये प्रतिकिलो होते. त्यातुलनेत आज चांदीचे दर हे 500 रूपयांनी कमी होऊन 92 हजार रूपये प्रतिकिलोपर्यंत खाली आल्याचे दिसून आले आहे.
जळगावमधील चांदीचे दर (प्रति किलो)
● 24 मे- 92,000 रूपये
● 23 मे- 92,500 रूपये
● 22 मे- 95,800 रूपये
● 21 मे- 94,600 रूपये
● 20 मे- 96,500 रूपये
● 19 मे- 93,000 रूपये
● 18 मे- 93,000 रूपये
● 17 मे- 89,100 रूपये
● 16 मे- 89,100 रूपये
● 15 मे- 87,600 रूपये