जळगावमध्ये सोने व चांदीचे दर थोडे नरमले, जाणून घ्या आजचे ताजे दर
जळगाव टुडे । शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोमवारी (ता.20) चांदीचा दर हा जीएसटीसह 96 हजार 500 रूपये प्रति किलोपर्यंत जाऊन पोहोचला होता. सुदैवाने आज मंगळवारी (ता.21) प्रति किलोमागे सुमारे 1900 रूपयांची घट होऊन चांदीचे दर हे 94 हजार 600 रूपयांपर्यंत स्थिरावले. कालच्या तुलनेत सोन्याच्या दरातही आज किंचीत घट झाल्याचे दिसून आले आहे. (Gold And Silver Price)
जळगावच्या सुवर्ण बाजारात सोमवारी चांदीचे दर 96 हजार 500 रूपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचल्याने ग्राहकांच्या छातीत धडकीच भरली होती. सुदैवाने मंगळवारी बाजार खुला झाल्यावर चांदीचे दर 1900 रूपयांनी कमी झाले. जळगावमध्ये 12 मे रोजी चांदीचे दर 87000 हजार रूपये प्रतिकिलो होते, त्या तुलनेत आजचा दर हा 7500 रूपयांनी जास्तच आहे.
सोन्याच्या दरातही झाली किंचीत घट !
दरम्यान,आज मंगळवारी जळगावमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर हा 6,830 रूपये प्रतिग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,451 रूपये प्रति ग्रॅम इतका आहे. तसे पाहता 22 कॅरेट सोन्याच्या दरातही एकाच दिवसात प्रतिग्रॅम जवळपास 60 रूपयांची घट झाली आहे, तर 24 कॅरेट सोन्याच्या दरात 65 रूपयांची घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. चांदीच्या तुलनेत सोन्याच्या दरातील घट ही नाममात्र असली तरी ग्राहकांना त्यामुळे थोडा तरी दिलासा मिळाला आहे.