चांदीत पुन्हा 3500 रूपयांची वाढ…जाणून घ्या जळगावमधील आज सोमवारचे सोने-चांदीचे दर
जळगाव टुडे । शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शनिवारी (ता.18) चांदीचे भाव प्रतिकिलो सुमारे 93,000 रूपयांपर्यंत जोऊन पोहोचले होते. त्यानंतर दोनच दिवसात सोमवारी (ता.20) पुन्हा चांदीत 3500 रूपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे जळगावमधील चांदीचे दर हे आता 96 हजार 500 रूपये प्रति किलो झाले आहेत. तुलनेत सोन्याच्या दरात फार लक्षणीय वाढ झालेली नाही. (Gold And Silver Price)
जळगावच्या सुवर्णबाजारात शनिवारी चांदीचा भाव प्रति किलो 93000 रूपये प्रतिकिलो इतका होता. दुसऱ्या दिवशी रविवारी व्यवहार बंद असल्याने त्यात कोणतीच वाढ झाल्याचे निदर्शनास आले नाही. मात्र, सोमवारी बाजार खुला होताच चांदीच्या दरात अचानक 3500 रूपयांची वाढ होऊन किलोचा दर 96,500 रूपयांपर्यंत पोहोचल्याचे दिसून आले. 11 मे रोजी जळगावमध्ये 87000 रूपये किलो असलेल्या चांदीच्या दरात त्यामुळे आतापर्यंत तब्बल 9500 रूपयांची वाढ झालेली आहे.
सोन्याच्या दरात झाली किंचीत वाढ !
दरम्यान,आज सोमवारी जळगावमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर हा 6,890 रूपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,516 रूपये प्रति ग्रॅम इतका आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरातही एकाच दिवसात प्रतिग्रॅम जवळपास 50 रूपयांची वाढ झाली आहे, तर 24 कॅरेट सोन्याच्या दरात 54 रूपयांची वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. चांदीच्या तुलनेत सोन्याच्या दरातील वाढ ही नाममात्र असली तरी त्याचाही आलेख चढताच राहिला आहे.