जळगावमध्ये सोने व चांदीच्या दरात आज गुरूवारी (ता.06) अचानक मोठा बदल !
जळगाव टुडे । शहरातील सुवर्ण बाजारपेठेत बुधवारी (ता.05) 22 कॅरेट सोन्याचा दर हा जीएसटीसह 66 हजार 600 रूपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर हा 72 हजार 650 रूपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. आज गुरूवारी (ता.06) अचानक 700 ते 770 रूपयांची वाढ झाल्याने सोन्याचे दर पुन्हा एकदा तेजीत आले. तसेच चांदीच्या दरातही आज प्रति किलो सुमारे 1800 रूपयांची वाढ झाल्याचे दिसून आले. (Gold And Silver Price)
जळगावमध्ये बुधवारी (ता.05) सुमारे 2300 रूपयांची घसरण झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह 91,700 रूपये प्रति किलोपर्यंत खालावले होते. तुलनेत आज गुरूवारी (ता.06) दुसऱ्या दिवशी चांदीच्या दरात एकदम 1800 रूपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदीचे दर 93 हजार 500 रूपये प्रति किलोपर्यंत वधारले. दरम्यान, सोने व चांदीच्या दरातील मोठे चढ-उतार पाहुन ग्राहकांचे डोके चांगलेच चक्रावले आहे.
जळगावमधील सोने व चांदीचे दर (06 जून)
22 कॅरेट सोने- 67,300 रूपये (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट सोने- 73,420 रूपये (प्रति 10 ग्रॅम)
चांदी- 93,500 रूपये (प्रति किलो)