जळगावमध्ये सोने व चांदीचे दर आज बुधवारी (ता.05) पुन्हा धाडकन कोसळले !
जळगाव टुडे । शहरातील सुवर्ण बाजारपेठेत मंगळवारी (ता.04) चांदीचा दर हा जीएसटीसह 94,000 प्रति किलोपर्यंत होता. आज बुधवारी (ता.05) सुमारे 2300 रूपयांची घसरण झाल्याने चांदीचे दर 91 हजार 700 रूपये प्रति किलोपर्यंत खाली आले. दुसरीकडे सोन्याच्या दरातही आज बुधवारी प्रति 10 ग्रॅम 220 रूपयांची घट नोंदविण्यात आली. ग्राहकांना त्यामुळे काहीअंशी दिलासा मिळाला. (Gold And Silver Price)
मंगळवारी (ता.04) जळगावमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम जीएसटीसह 66,800 रूपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम दर हा जीएसटीसह 72,870 रूपये इतका होता. तुलनेत आज बुधवारी (ता.05) जळगावमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर हा 66,600 रूपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 72,650 रूपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.
जळगावमध्ये सोमवारी (ता.03) चांदीचे दर जीएसटीसह 92,800 रूपये प्रतिकिलो होते. परंतु, दुसऱ्याच दिवशी मंगळवारी (ता.04) त्यात 1200 रूपयांची वाढ झाली होती आणि चांदीचे दर 94 हजार रूपये प्रतिकिलो पर्यंत पोहोचले होते. सुदैवाने आज बुधवारी पुन्हा चांदीचे दर हे 2300 रूपयांनी घसरले आणि 91,700 रूपयांवर स्थिरावले.