जळगावमध्ये सोने व चांदीचे दर आज सोमवारी (ता.03) पुन्हा धड्डाम कोसळले !
जळगाव टुडे । शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आज सोमवारी (ता.03) सोने व चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. प्राप्त माहितीनुसार 22 कॅरेट सोन्याचे दर आज प्रति 10 ग्रॅम 400 रूपयांनी तर 24 कॅरेट सोन्याचे दर आज प्रति 10 ग्रॅम 440 रूपयांनी कमी झाले झाले. चांदीच्या दरात देखील आज प्रति किलो 700 रूपयांची घट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे ग्राहकांना काहीअंशी दिलासा मिळाला. (Gold And Silver Price)
जळगावमध्ये शनिवारी (ता.01) चांदीचे दर 93 हजार 500 रूपये प्रति किलो होते, त्यातुलनेत आजचे सोमवारचे चांदीचे दर हे 92 हजार 800 रूपये प्रति किलो नोंदवण्यात आले. 29 मे रोजी सुमारे 97 हजार 700 रूपये प्रति किलोपर्यंत जाऊन पोहोचलेले चांदीचे दर आता जवळपास 05 हजार रूपयांनी कमी झाले आहेत. चांदीचे दर सातत्याने कमी होत असल्याने ग्राहकांनाही त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
सोन्याच्या दरातही सतत घट
शनिवारी (ता.01) जळगावमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर हा 66 हजार 500 रूपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 72 हजार 550 रूपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. त्यातुलनेत आज सोमवारी 22 कॅरेट सोन्याचे दर आज 66 हजार 100 रूपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचे दर हे 72 हजार 110 रूपये प्रति 10 ग्रॅम नोंदवण्यात आले. चांदीसोबत सोन्याच्या दरातही आता हळूहळू घट होत असल्याने ग्राहकांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे.