चांदीची एक लाखांकडे वाटचाल…जाणून घ्या, जळगावमधील आजचे सोने-चांदीचे दर
जळगाव टुडे । शहरातील सुवर्ण बाजारपेठेत मंगळवारी (ता.28) चांदीचा दर हा जीएसटीसह 96 हजार 500 रूपये प्रति किलोपर्यंत होता. त्यात आज बुधवारी (ता.29) सुमारे 1200 रूपयांची वाढ झाल्याने चांदीचे दर हे 97 हजार 700 रूपये प्रति किलोपर्यंत जाऊन पोहोचले. दुसरीकडे सोन्याच्या दरातही आज बुधवारी प्रति 10 ग्रॅम 270 रूपयांची वाढ नोंदविण्यात आली. (Gold And Silver Price)
जळगावमध्ये 20 मे रोजी चांदीचे दर हे जीएसटीसह 96 हजार 500 रूपये प्रतिकिलो इतके होते आणि तेव्हाचे चांदीचे दर सर्वाधिक मानले जात होते. मात्र, त्यातुलनेत आजचे चांदीचे दर हे 97 हजार 700 रूपये प्रति किलो म्हणजेच 1200 रूपयांनी जास्त आहेत. काही दिवसांपासूनचा चांदीचा दरवाढीचा ट्रेंड लक्षात घेता लवकरच चांदी एक लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता त्यामुळे व्यक्त होत आहे.
सोन्याच्या दरातही झाली वाढ
मंगळवारी (ता.27) जळगावमध्ये 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम दर जीएसटीसह 66,850 रूपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम दर जीएसटीसह 72,930 रूपये इतका होता. तुलनेत आज बुधवारी (ता.29) जळगावमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर हा 67,100 रूपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 73,200 रूपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. सोन्याचे दर देखील हळूहळू नवीन उंची गाठताना दिसून आले आहेत.