मोठी बातमी….जळगावमध्ये एकाच दिवसात ‘इतक्या’ रूपयांनी वधारले चांदीचे भाव !
जळगाव टुडे । शहरातील सुवर्ण बाजारपेठेत कालपर्यंत सोन्याचे भाव सातत्याने वाढत असल्याचे दिसून आले होते. मात्र, आता चांदीचे भाव देखील दिवसागणिक नवीन उंची गाठू लागल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडाचे पाणीच पळाले आहे. शनिवारी (ता.18) देखील चांदीचे भाव प्रतिकिलो सुमारे 93,000 रूपयांपर्यंत जोऊन पोहोचले. विशेष म्हणजे चांदीच्या भावात एकाच दिवसात तब्बल 3900 रूपयांची वाढ नोंदवली गेली. (Gold And Silver Price)
जळगावच्या सुवर्णबाजारात शुक्रवारी चांदीचा भाव प्रति किलो 89,100 रूपये इतका होता. शनिवारी त्यात 3900 रूपयांची वाढ होऊन चांदीचे भाव 93000 रूपये प्रति किलोपर्यंत गेले. वास्तविक दहा दिवसांपूर्वी जळगावमध्ये चांदीचा भाव हा 85,200 रूपये प्रतिकिलो होता. त्या तुलनेत आजचे शनिवारचे भाव हे जवळपास 7,800 रूपयांनी जास्तच आहेत. चांदीच्या भावात ही दहा दिवसातच झालेली वाढ लक्षणीय अशीच असून, ग्राहकांनी त्याबद्दल आश्चर्य देखील व्यक्त केले आहे.
सोन्याच्या भावात झाली किंचीत वाढ
दरम्यान,आज शनिवारी जळगावमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 6,840 रूपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,462 रूपये प्रति ग्रॅम इतका आहे. 22 कॅरेट सोन्याच्या भावातही एकाच दिवसात प्रतिग्रॅम जवळपास 80 रूपयांची वाढ झाली आहे, तर 24 कॅरेट सोन्याच्या भावात 87 रूपयांची वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.