सोने-चांदी पुन्हा कडाडले…जाणून घ्या, जळगाव शहरात आज कसे आहेत भाव ?

जळगाव टुडे । शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सोने व चांदीच्या भावात मोठी तेजी-मंदी दिसून आली आहे. आज गुरूवारी (ता.११) देखील सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅम २०० ते २२० रूपये तर प्रति १०० ग्रॅम २००० ते २२०० रूपयांनी कडाडले आहेत. चांदीत देखील प्रति किलो १००० रूपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. सोने व चांदीच्या दरातील हे मोठे चढ-उतार पाहुन ग्राहक देखील आता चक्रावले आहेत. ( Gold Silver Price )

Gold Silver Price
जळगावमध्ये काल बुधवारी (ता.१०) जीएसटीसह प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव हा ६७,१०० रूपये आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव हा ७३,२०० रूपये इतका होता. तुलनेत आज गुरूवारी जळगावमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव हा ६७,३०० रूपये तसेच २४ कॅरेट सोन्याचा भाव हा ७३,४२० रूपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. १८ कॅरेट सोन्याचा भाव देखील आज ५५,०६० रूपये प्रति १० ग्रॅम इतका आहे, त्यात देखील बुधवारच्या तुलनेत १६० रूपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

याशिवाय जळगावमध्ये बुधवारी चांदीचा भाव जीएसटीसह ९४,५०० रूपये प्रति किलो होता. त्या तुलनेत आज गुरूवारी चांदीच्या भावात १००० रूपयांची वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे चांदीचा भाव ९५,५०० रूपये प्रति किलोपर्यंत जाऊन पोहोचला आहे.

जळगावमधील सोने व चांदीचा भाव ( ११ जुलै )
■ २२ कॅरेट सोने- ६७,३०० रूपये (प्रति १० ग्रॅम)
■ २४ कॅरेट सोने- ७३,४२० रूपये (प्रति १० ग्रॅम)
■ १८ कॅरेट सोने- ५५,०६० रूपये (प्रति १० ग्रॅम)
■ चांदी- ९५,५०० रूपये (प्रति किलो)

WhatsApp Group

Related Articles

Back to top button