भाजपा स्टार प्रचारकांच्या यादीत संकटमोचक गिरीश महाजन यांचाही समावेश
Girish Mahajan : भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीत 400 जागांचा पल्ला गाठण्यासाठी 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. सदरच्या यादीत देश व राज्य पातळीवरील अनेक नेत्यांचा समावेश असताना, भाजपाचे संकटमोचक मानले जाणारे राज्याचे ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांचाही त्यात समावेश आहे. जळगाव जिल्ह्यासाठी ती मोठी अभिमानाची गोष्ट आहे.
भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेसह भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा तसेच ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ, प्रमोद सावंत, भूपेंद्र पटेल, विष्णूदेव साई, डॉ. मोहन यादव, भजनलाल शर्मा, रामदास आठवले, नारायण राणे, अनुराग ठाकूर, ज्योतिरादित्य सिंधिया, स्मृती इराणी, शिवराज चौहान, के. अण्णामलाई, रविकिशन, मनोज तिवारी यांच्यासह महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण, अजित पवार यांचीही नावे समाविष्ट आहेत.
असे आहेत भाजपाचे महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक स्टार प्रचारक
■ एकनाथ शिंदे ■ अजित पवार ■ देवेंद्र फडणवीस ■ रावसाहेब दानवे ■ सम्राट चौधरी ■ अशोक चव्हाण ■ विनोद तावडे ■ पंकजा मुंडे ■ चंद्रशेखर बावनकुळे ■ आशिष शेलार ■ सुधीर मुनगंटीवार ■ राधाकृष्ण विखे पाटील ■ पियूष गोयल ■ गिरीश महाजन ■ विजयकुमार गावित ■ अतुल सावे ■ धनंजय महाडीक ■ अमर साबळे ■ रविंद्र चव्हाण ■ चंद्रकांत पाटील