जामनेर शहरात सुमारे 64 कोटी रूपयांच्या विकासकामांचे आज शनिवारी भूमिपूजन
राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांचा पाठपुरावा
Girish Mahajan : राज्याचे ग्रामविकास, पंचायत राज तसेच पर्यटन मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या पाठपुराव्यातून जामनेर नगर परिषद अंतर्गत सुमारे 64 कोटी 05 लाख रूपये किंमतीची विविध विकासकामे मंजूर झाली आहेत. त्यांचे भूमिपूजन शनिवारी (ता.16) सकाळी 10.00 वाजता मंत्री श्री. महाजन आणि जामनेरच्या माजी नगराध्यक्ष सौ.साधनाताई महाजन करणार आहेत.
ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या प्रयत्नांनी मंजूर झालेल्या विविध विकासकामांमुळे गेल्या काही वर्षात जामनेर शहराचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. शहरातील नागरिकांना सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सोयी-सुविधा पुरवित असताना, आता मलनिस्सारण प्रकल्प (टप्पा 2) करीता सुमारे 25.26 कोटी रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय जामनेर शहराच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी 13.73 कोटी रूपये, नाट्यगृह बांधकामासाठी सुमारे 25 कोटी रूपये, जय हिंद यूथ क्लब अंतर्गत स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व वाचनालय बांधकामासाठी 60 लाख रूपयांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे.
जामनेर नगर परिषद अंतर्गत सुमारे 64 कोटी 05 लाख रूपये किंमतीची विविध विकासकामे मंजूर असताना, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी सर्व कामांचे भूमिपूजन ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन आणि सौ. साधनाताई महाजन यांचे हस्ते शनिवारी सकाळी 10.00 वाजता केले जात आहे. सदरचा कार्यक्रम गणपती नगराच्या पाठीमागे असलेल्या ओशिया माता नगरात आयोजित केला आहे. यावेळी जामनेरचे सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जामनेर विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पार्टीने केले आहे.