भाजप नेते गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात शुक्रवारी विविध कार्यक्रम
जळगाव टुडे । भाजपाचे राज्यातील ज्येष्ठ नेते व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचा शुक्रवारी (ता.17) वाढदिवस आहे. त्यानिमित्त जळगाव शहरात विविध कार्यक्रमांचे व सामाजिक उपक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपा जळगाव जिल्हा कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवशी शुक्रवारी जळगाव शहर महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्यातर्फे सकाळी साडेदहा वाजता लहान मुलांचे बाल निरीक्षण गृह (रिमांड होम) येथे जेवण वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. तसेच सकाळी अकराला “सेवालय” जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे रुग्णांना आणि “मातोश्री वृद्धाश्रम” येथे सकाळी साडेअकराला वाजता जेवण वाटप करण्यात येणार आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांचा मित्र परिवार, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित आवर्जून राहावे, असे आवाहन भाजपा जळगाव जिल्हा कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.