राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सदरच्या मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.

मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय :
✅ मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत अतिरिक्त 7 हजार किलोमीटरचे रस्ते व पुलाची कामे करणार.
✅ ऑनलाईन पद्धतीने वाळू, रेती पुरविण्यासाठी सर्वंकष सुधारित रेती धोरण राबविण्यात येणार. तसेच ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर वाळू विक्री दर निश्चित करणार.
✅ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात भरीव वाढ. आता मिळणार दरमहा 18 हजार रुपये मानधन.
✅ राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करण्यात आली असून, आश्वासित प्रगती योजनेत सुधारणा केली जाणार आहे.
✅ उच्च तंत्रज्ञानाच्या अतिविशाल उद्योगांना प्रोत्साहन देणार असून, राज्यातील कमी विकसित भागांना त्याचा फायदा होणार आहे.
✅ सायन कोळीवाड्यातील सिंधी निर्वासितांच्या 25 इमारतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्याचा म्हाडा विकास करणार आहे.
✅ अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना लागू केल्या जातील.
✅ राज्यात जळगाव, लातूर, बारामती, सांगली (मिरज), नंदुरबार , गोंदिया या सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय सुरु केले जाणार आहे.
✅ औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देण्यासाठी 50 टक्के मुद्रांक शुल्क सवलत लागू केली जाईल.
✅ भुदरगड तालुक्यात नवीन समाजकार्य महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button