Eknath Khadse : देवेंद्र फडणवीसांनी मुलीची शपथ घेऊन एकनाथ खडसेंना दिली होती ‘ही’ ऑफर….!

Eknath Khadse : ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय मतभेद सर्वश्रूत आहेत. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी केलेला नवीन गौप्यस्फोट राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणारा ठरला आहे. खडसे यांनी आरोप केला आहे की, देवेंद्र फडणवीस यांनी मुलीची शपथ घेऊन त्यांना एक मोठी ऑफर दिली होती, जी नंतर त्यांनी पाळळी नाही.

Eknath Khadse: Devendra Fadnavis gave ‘this’ offer to Eknath Khadse by swearing a daughter….!

एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे की, २०१९ साली देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना राज्यपाल पदाची ऑफर दिली होती. तेव्हा आम्ही दोघेच होतो. फडणवीस म्हणाले, ‘नाथाभाऊ, तुमची मी राज्यपालपदासाठी शिफारस करतो.’ त्यावर मी त्यांना सांगितले की, ‘माझा यावर विश्वास बसत नाही.’ यावर फडणवीस यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगितले की, ‘हा देवेंद्र फडणवीसचा शब्द आहे.’ पुढे काय झाले, मला माहिती नाही, पण त्यांनी मला अशाप्रकारे आश्वासन दिले होते.” खडसेंच्या या गौप्यस्फोटामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. फडणवीसांनी त्यांना दिलेले हे आश्वासन पूर्ण झाले नाही, असे खडसेंचे म्हणणे आहे. त्यामुळे यावर फडणवीसांची प्रतिक्रिया काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर मी फुली मारली आहे

एकनाथ खडसे यांनी आणखी एक मोठा खुलासा करत भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करण्याच्या शक्यतेवर पूर्णविराम दिला आहे. एका कार्यक्रमात बोलताना खडसे यांनी सांगितले की, भाजपमध्ये प्रवेश करताना त्यांची स्वतःची इच्छा नव्हती. खडसे म्हणाले, “दिल्लीतील एका अतिज्येष्ठ नेत्यांनी मला फोन करून भाजपमध्ये जाण्याचे सांगितले होते. त्यानंतर, दिल्लीतील एका कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि विनोद तावडे यांच्या उपस्थितीत माझा भाजप प्रवेश झाला. त्या वेळी रक्षा खडसे देखील उपस्थित होत्या. प्रत्यक्षात अजूनही भाजपने माझा प्रवेश झाल्याचे घोषित केलेले नाही. त्यामुळे आता भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर मी फुली मारली आहे, असेही खडसे यांनी स्पष्ट केले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button