अनर्थ टळला; एकनाथ खडसेंवर विधान भवनाच्या पायऱ्या चढताना गुदरला मोठा बाका प्रसंग…!

जळगाव टुडे । आमदार एकनाथ खडसे हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. भाजपकडूनही त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचा राजकीय वनवास संपण्याचे संकेत देखील मिळाले आहेत. तशात आज बुधवारी मोठा अनर्थ ठळला. एकनाथ खडसे विधान भवनाच्या पायऱ्या चढत असतानाच बाका प्रसंग गुदरल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. ( Eknath Khadse )

एकनाथ खडसे यांचा भाजपमधील पक्षप्रवेश बऱ्याच दिवसांपासून रखडला आहे. वास्तविक लोकसभेच्या निवडणुकीत सून रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर एकनाथ खडसेंनी भाजपचा खुला प्रचार केला. वैयक्तिक ताकद वापरून सूनेला निवडणुकीत अडीच लाखांपेक्षा जास्त मताधिक्यही मिळवून दिले. आता रक्षा खडसेंना केंद्रात राज्यमंत्री पदाचा बहुमान मिळाला आहे. तर खुद्द एकनाथ खडसेंना पुन्हा राज्याच्या राजकारणात मोठी जबाबदारी देण्याच्या हालचाली भाजपकडून केल्या जात आहेत. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी एकनाथ खडसेंची भेट घडून आल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तबच झाल्याचे सुद्धा बोलले जात आहे. सगळे काही शुभाशुभ होत असताना, आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर एकनाथ खडसे अचानक अडखळून पडले.

एकनाथ खडसे विधानभवनाच्या पायऱ्यांवर अडखळून पडल्यानंतर सोबतच्या कार्यकर्त्यांनी त्यांना वेळीच सावरले. मात्र, घटना घडल्यानंतर तिथे उपस्थित असणाऱ्या सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. अर्थात सावरल्यानंतर एकनाथ खडसे स्वतःच पायऱ्या चढून सभागृहात गेले. मात्र, या अनपेक्षित प्रकारामुळे तिथे उपस्थित असलेले सर्वजण क्षणभर भांबावले. नेमके काय घडले कोणालाच काही कळेना. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button