डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात अत्यवस्थ रूग्णाच्या उजव्या पायाच्या फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
Dr. Ulhas Patil Medical Hospital : 25 वर्षीय भुषण बोरोले या तरूणाच्या उजव्या पायास गुडघ्याखाली मोटरसायकल अपघातात फ्रॅक्चर झाले होते. अत्यवस्थ अवस्थेतच त्याला जळगावातील डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तज्ज्ञांनी ट्राॅमा मॅनेजमेंट करून त्याच्या पायावर टीबीया शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली.
निंभोरा (ता. रावेर) येथील तरूणास अपघातानंतर छत्रपती संभाजीनगरातील रूग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, श्वास घ्यायला त्रास होत असल्याने नंतर त्याला जळगावातील डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयातील सर्जिकल अतिदक्षता विभागात दाखल करून घेण्यात आले. तिथे सात दिवस त्याच्यावर फिजिशियन व अस्थीरोग तज्ज्ञांच्या मदतीने उपचार करण्यात आले. दरम्यान, त्याच्या उजव्या पायाचे फ्रॅक्चर रॉड टाकून जोडण्यात आले. अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. दीपक अग्रवाल यांनी सदरची शस्त्रक्रिया केली. त्यांना डॉ. प्रसाद बांबरसे, डॉ. चाणक्य, डॉ.अंकीत भालेराव आणि डॉ.गौतम कुंभार यांनी सहकार्य केले. रूग्ण दाखल झाला त्यावेळी त्याला श्वासोश्वासाचा त्रास होता. अपघातात शरीरातील चरबीचे तुकडे रक्त वाहिन्यांमध्ये जावून अशी परिस्थिती उद्भवते. रक्त चाचण्यांमध्ये डी डायमर वाढले होते. फॅट एम्बोलिजम हा अत्यंत गंभीर आजार असून त्या करीता रूग्णावर लवकरात लवकर उपचार होणे गरजेचे असते. यासाठी रूग्ण लवकर शस्त्रक्रियेसाठी फिट व्हावा लागतो. त्याअनुषंगाने रूग्णांचा टु डी इको देखील करण्यात आला. एक्सरे मधून फ्रॅक्चर निदान झाले होते. अखेर त्या रूग्णाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.