डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर व कमलदृष्टी अभियानाचे आयोजन
Dr. Ulhas Patil : जळगावचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत 23 फेब्रुवारीपासून 08 मार्चपर्यंत पंधरवाडा आरोग्य शिबिर व कमलदृष्टी अभियानाचे आयोजन डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात करण्यात आले आहे.
पंतप्रधान श्री. मोदी यांनी प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत सर्वसामान्यांना सुमारे 05 लाख रूपयापर्यंतच्या उपचाराचा लाभ मिळवून दिला आहे. त्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानत माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त पंधरवाडा आरोग्य शिबिर व कमलदृष्टी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे तज्ज्ञ डॉक्टर तपासणी करणार असून सर्व आजारांच्या शस्त्रक्रिया व उपचार देखील मोफत केले जाणार आहे. शिबिराचा लाभ मिळवण्यासाठी आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड व ओरीजीनल रेशनकार्ड तसेच आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. कमलदृष्टी अभियानात 64 व्या वाढदिवसानिमीत्त प्रथम येणाऱ्या 64 रूग्णांवर फेको पध्दतीने मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
लाभ घ्यायचा आहे, यांच्याशी संपर्क साधा
अभियानासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी आशिष भिरूड यांच्याशी 9373350009 या क्रमांकावर संपर्क साधावा. कमलदृष्टी अभियानात वैद्यकिय आघाडी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक वैद्यकिय आघाडीचे नेत्ररोग तज्ञ डॉ. नि.तु पाटील तपासणी, मार्गदर्शन व शस्त्रक्रिया करणार आहे. कमलदृष्टी अभियानात सहभागी होण्यासाठी 8055595999 या क्रमांकावर डॉ. नि.तु. पाटील यांचेशी संपर्क करावा. जास्तीत जास्त रूग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन रूग्णालय प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.