युवा संवाद सभेच्या माध्यमातून देशाचे तेजस्वी गृहमंत्री साधणार युवकांशी संवाद
युवकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे - डॉ. केतकीताई पाटील यांचे आवाहन
Dr.Ketaki Patil : देशाचे कणखर नेतृत्व आणि तेजस्वी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा हे मंगळवारी (ता. 05) जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सागर पार्कवरील युवा संवाद सभेतून ते युवकांशी संवाद साधणार आहेत. त्याठिकाणी जिल्ह्यातील युवकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून केंद्रीय मंत्री श्री. शहा यांचे विचार ऐकण्याची संधी साधावी, असे आवाहन भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ.केतकीताई पाटील यांनी केले आहे.
युवा संवाद कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व भाजपा नेते तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन आदींची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहेत. या भव्य युवा संवाद सभेला उत्तर महाराष्ट्र विभागातील सर्व खासदार,आमदार, पदाधिकारी व युवा नव मतदार युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. भारत तरुणांचा देश आहे. स्टार्ट अप आणि मेक इन इंडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झाल्या आहेत. केंद्र सरकार युवकांसाठी सतत नवीन ध्येय धोरणे आखत असते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मार्गदर्शन युवकांसाठी प्रेरणादायी स्त्रोत ठरणार आहे. त्यामुळे युवा संवाद सभेला जिल्ह्यातील युवकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असेही भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकीताई पाटील यांनी म्हटले आहे.