Dhule News : धुळे तालुक्यातील निमडाळे येथे दोन विद्यार्थांचा तलावाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू…!
Dhule News : धुळे तालुक्यातील निमडाळे येथील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या आठवीच्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. हितेश सूर्यवंशी (वय १४) आणि मयूर वसंत खोंडे (वय १४) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Dhule News: Two students drowned in lake water at Nimdale in Dhule taluka.
निमडाळे येथील आठवीचा विद्यार्थी हितेश सूर्यवंशी व मयूर वसंत खोंडे यांच्यासह इतर विद्यार्थ्यांची वन भोजनासाठी सहल गेली होती. यावेळी परिसरात तलावासह खदान होती. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हितेश व मयूर हे तलावात पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते तलावात गटांगळ्या खाऊ लागले. दोघे विद्यार्थी बुडत असताना तेथील शिक्षकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र काहीच उपयोग झाला नाही. परिसरातील काही पट्टीच्या पोहणाऱ्यांनी दोघांना बाहेर काढून हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. दोन्ही विद्यार्थ्यांच्या आप्तेष्ठांनी रूग्णालय परिसरात केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.