शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी पवार गट लवकरच काँग्रेसमध्ये विलिन होणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाकीत

जळगाव टुडे । काँग्रेस आणि आमच्या पक्षात फरक नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरु यांच्या विचाराचे आहोत. यामुळे अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच केला आहे. प्रत्यक्षात शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना लवकरच काँग्रेसमध्ये विलीन होईल, असे भाकीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पाचोरा येथील कैला माता मंदिराच्या शेजारी असलेल्या पटांगणावर बुधवारी (ता.08) दुपारी सभा झाली. त्यावेळी ते फडणवीस बोलत होते. ते म्हणाले की, इंडिया आघाडी म्हणजे नेता, नियत आणि नीती नसलेली आघाडी आहे. यांच्यात कुणीही पंतप्रधान पदाचे नेतृत्व करण्यासारखे नाही. आघाडीतील प्रत्येक जण स्वतःला पंतप्रधान पदाचे नेते समजतात त्यांच्या इंजिनमध्ये फक्त नेतेच आहेत, तिथे जनतेला बसण्यास जागा नाही. आघाडीतील नेत्यांना कन्व्हीन्सही करता येत नाही म्हणून ते जनतेला कन्फ्युज करत असल्याची टीका त्यांनी केली. यावेळी उबाठाचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे आणि माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. पाटील यांनी आपले तिकीट का कापले त्याचे आत्मचिंतन करावे. उलट त्यांचे तिकीट कापून आम्हीच त्यांचा वाचविले आहे, असेही फडणवीस म्हटले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button