Delhi News : कोचिंग क्लासच्या तळघरात अडकलेल्या तीन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून झाला दुर्दैवी मृत्यू !

Delhi News : गेल्या काही दिवसांपासून सगळीकडे पावसाने कहर केला असून, बऱ्याच ठिकाणी पुराच्या पाण्याने काही जणांचा जीव देखील घेतला आहे. असाच एक खळबळजनक प्रकार दिल्लीत उघडकीस आला आहे, ज्यामध्ये कोचिंग क्लासच्या तळघरात अडकलेल्या तीन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तिन्ही विद्यार्थी ‘आयएएस’ची तयारी करीत होते, अशी माहिती मिळाली आहे.

Delhi News : Three students trapped in the basement of the coaching class drowned in the unfortunate death!
दिल्लीमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी शिरले आहे. मध्य दिल्लीमधील राजेंद्र नगर परिसरात युपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले आहेत. राव कोचिंग क्लासच्या तळघरात असलेल्या ग्रंथालयात पाणी भरल्यामुळे ही दुर्घटना घडली. तळघरातील ग्रंथालयात जवळपास १२ फूट पाणी भरल्याने काही विद्यार्थ्यांना बाहेर पडता आले नाही, त्यातील तीन विद्यार्थ्यांनी आपले प्राण गमावले. सनदी अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न संबंधित क्लासच्या हलगर्जीपणामुळे अधुरेच राहिले. नेविन डाल्विन हा केरळचा विद्यार्थी पीएचडी करत होता आणि सोबतच सनदी अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न होते. तान्या विजय कुमार सोनी, श्रेया राजेंद्र यादव या दोन तरुणींचाही पाण्यात बुडून मृत्यू ओढवला आहे.

विद्यार्थी रस्त्यावर उतरून करणार निषेध
मध्य दिल्लीचे डीसीपी एम हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी साधारण सात वाजता यंत्रणांना घटनेची माहिती मिळाली. दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने रस्त्यावरील पाणी सखल भागात साचलेले असताना, राजेंद्र नगरमधील कोचिंग क्लासच्या तळघरात पाणी शिरल्याचे समजले. त्यात काही विद्यार्थी अडकले होते, पैकी तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. इतक्या लवकर कोचिंग क्लासचे तळघर पाण्याने कसे भरले, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरु आहे. दरम्यान, या घटनेने संतप्त झालेले विद्यार्थी आप सरकारचा निषेध करण्यासाठी पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत. तर दिल्ली सरकारने या घटनेचे दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button