Crime News: भुसावळमध्ये ३ लाखांच्या बनावट नोटा चालविण्यासाठी आलेल्या तिघांना अटक…!
Crime News : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात बुधवारी सायंकाळी बाजारपेठ पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन जणांना अटक केली. त्यांच्याकडून तीन लाख रुपयांच्या बनावट नोटा देखील जप्त करण्यात आल्या. तीनही जण एका मोठ्या बनावट नोटांच्या रॅकेटशी संबंधित असण्याची शक्यता असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
Crime News : Three people who came to Bhusawal to spend fake notes of 3 lakhs were arrested…!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारपेठ पोलिसांनी सायंकाळी तिघांना बनावट नोटा विक्रीसाठी आणताना रंगेहाथ पकडले. अटक केलेल्या आरोपींमध्ये सय्यद मुशारद अली मुमताज अली (वय ३८, रा. दुश्मनीय पार्क, शिवाजीनगर जळगाव), नदीम खान रहीम खान (वय ३,० रा. सुभाष चौक, शनीपेठ जळगाव), अब्दुल हकीम अब्दुल कादर (वय ५७, अब्दुल अमित चौक, रसलपुर रोड रावेर) यांचा समावेश आहे.
बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, काहीजण भुसावळ शहरात बनावट नोटा विक्रीसाठी आणत आहेत. या माहितीच्या आधारे निरीक्षक वाघ यांनी पथक तयार करून भुसावळ शहरात सापळा रचला. संशयित व्यक्ती बुधवारी सायंकाळी तीन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन व्यवहार करण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी त्यांच्यावर बारकाईने नजर ठेवून ठेवली होती. शेवटी, संशयितांनी एका ठिकाणी व्यवहार पूर्ण केला आणि पैसे देण्याची तयारी दर्शवली. पोलिसांनी त्यांच्यावर झडप घालून रंगेहाथ पकडले. रात्री उशिरा स्टेट बँकेच्या अधिकार्यांनी जप्त केलेल्या नोटांची तपासणी केली, तेव्हा त्यातील तीन लाख रुपये बनावट असल्याचे दिसून आले.