Crime News : अनेकांच्या जीवावर उठलेल्या ‘त्या’ ऑडी कारमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा मुलगा पण होता…!
Crime News : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याचा भरधाव ऑडी कारच्या अपघातात सहभाग असल्याचे उघड झाले आहे. या अपघातात पाच दुचाकी व चारचाकी वाहनांना जोरदार धडक बसली होती. अपघातानंतर गाडीतून पळून गेलेले दोघे पोलिसांच्या हाती लागले होते. परंतु संकेतवर कोणतीही कारवाई झाली नव्हती. दरम्यान, संकेतची चौकशी केल्यानंतर तो अपघातावेळी ऑडी कारमध्येच असल्याची कबुली त्याने स्वतः दिल्याचे पोलिस उपायुक्त राहुल मदने यांनी पत्रकारांना सांगितले.
Crime News : The son of BJP State President Bawankule was also in ‘that’ Audi car that killed many people…!
अपघातात एक जण जखमी झाला असून, सुदैवाने कोणाचाही जीव गेला नाही. घटनेनंतर तपास सुरू झाल्यावर सोमवारी पोलिसांनी अपघातात सहभागी असलेल्या दोघांना अटक केली, तर मंगळवारी संकेत बावनकुळे याची चौकशी करण्यात आली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याच्या भरधाव ऑडी कारने झालेल्या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसली, तरी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली. या फूटेजमध्ये अपघातानंतर कारची नंबरप्लेट काढून ठेवल्याचे दिसत असले तरी नंतर नंबरप्लेट कारमध्येच असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे, अशी माहिती देखील पोलिस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली.
प्रकरणातील संशयास्पद गोष्टींमुळे नागपूर पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित
अपघाताच्या वेळी संकेत बावनकुळे कारमध्ये होते की नाही, याबाबत सुरुवातीला स्पष्टता नव्हती. सोमवारी या बाबतीत लपवाछपवी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून आले होते. पोलिसांनीही या प्रकरणावर बोलण्यास टाळाटाळ केली. मात्र, सीसीटीव्ही फूटेज व्हायरल झाल्याने आणि प्रकरणाची चर्चा वाढल्यामुळे मंगळवारी पोलिसांनी संकेत बावनकुळे यांची चौकशी केली. या चौकशीत संकेतने अपघाताच्या वेळी तो कारमध्येच असल्याची कबुली दिली. दरम्यान, प्रकरणातील संशयास्पद गोष्टींमुळे नागपूर पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कारच्या चालकाने मद्यप्राशन केल्याचे उघड झाले असून, पुढील तपास आता वेगाने सुरू झाला आहे.