Crime News : पोटच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला १२ वर्षे सक्तमजुरी, 20 हजार रुपये दंडाची शिक्षा..!
Crime News : स्वतःच्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने १२ वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिलीप घुमरे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. तीन वर्षांपूर्वी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून नराधम बापाविरोधात विविध कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Crime News: The murderous father who raped the girl’s stomach was sentenced to 12 years hard labour, 20 thousand rupees fine..!
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले यांनी केला. सहाय्यक फौजदार प्रवीण डावरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रतिभा थोरात, पी.एस.साबळे, दीपाली राहणे व स्वाती नाईकवाडी यांनी या खटल्यात सरकार पक्षाला सहाय्य केले. पीडित मुलगी, फिर्यादी, अहमदनगर जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गहिनीनाथ खेडकर, संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.छाया लोहारे यांच्या साक्षी या खटल्यात महत्त्वपूर्ण ठरल्या. अतिरिक्त सरकारी वकील गवते यांनी या खटल्यात सक्षम पुरावा समोर आणत जोरदार युक्तिवाद केला. तसेच आरोपीला शिक्षेची मागणी केली. सरकार पक्ष आणि आरोपीच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायाधीश घुमरे यांनी आरोपीला दोषी ठरवत १० वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड, कलम ३७६(२)(N) नुसार बारा वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड, पोक्सो कलम ६ नुसार बारा वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली. आरोपीला १२ वर्ष सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला आणखी एक वर्ष कारावास भोगावा लागेल.