Crime News : कायद्याचा धाक संपला; शेजाऱ्याने रात्री घरात घुसून ओढणीने हात-पाय बांधून महिलेवर केला बलात्कार…!

Crime News : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असून, ठाणे जिल्ह्यातही नुकतीच एक धक्कादायक घटना घडली आहे. शेजारी राहणाऱ्या नराधमाने रात्री एका महिलेच्या घरात घुसून हात-पाय ओढणीने बांधून तिच्यावर बलात्कार केला असून, या क्रूर घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी महिलेच्या फिर्यादीवरून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यास बेड्या देखील ठोकल्या आहेत.

Crime News : The fear of the law is over; The neighbor entered the house at night and tied the hands and feet with ropes and raped the woman…!

सदरची खळबळजनक घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पीडित महिलेने धैर्य दाखवून पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपीला अटक केली. त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने समाजातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

आरोपीने पीडित महिलेवर तिच्या लहान मुलीसमोरच केला अत्याचार

भाईंदर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री अकरा वाजेच्या सुमारास संशयित आरोपी हा शेजाऱ्याच्या घरात बळजबरीने घुसला. त्यावेळी घरात ३८ वर्षीय पीडित महिला आणि तिची तीन वर्षांची लहान मुलगी होती. दरम्यान, आरोपीने पीडितेचे हात-पाय ओढणीने बांधले आणि तिच्यावर जबरदस्ती बलात्कार केला. पीडितेवर तिच्या लहान मुलीसमोरच आरोपीने अत्याचार केला. प्रतिकार केल्याने आरोपीने महिलेवर हल्ला देखील केल्याची माहिती मिळाली आहे. महिलेने रात्र कशीबशी काढली आणि दुसऱ्या दिवशी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेनुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button